गुजरात राज्य विधानसभा निवडणूका ( Gujarat State Assembly Election 2022 ) संदर्भात भारतीय जनता पार्टी कडून ( Bharatiya Janata Party ) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. संघटनात्मक पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यासह जनसंपर्क वाढवून विधानसभा ( Vidhansabha ) विजयासाठी भाजपा कंबर कसली आहे. यासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे काही वरिष्ठ आणि जाणकार नेत्यांना गुजरात राज्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गोवा ( Goa ) राज्य विधानसभा निवडणूकीत कौतूकास्पद आणि ‘विजयी’ कामगिरी केल्यानंतर मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री ( Former State Minister ) बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांना गुजरात राज्य विधानसभा निवडणूकीसाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे यांच्यावर गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्याची ( Navsari District ) जबाबदारी सोपवली आहे.
हेही वाचा – मावळ तालुक्यात होणारा प्रकल्प गुजरातला गेला; राज ठाकरे भडकले, म्हणाले ‘उलटा प्रवास सुरु’
नवसारी जिल्ह्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर बाळा भेगडे हे गुजरातला रवाना झाले असून संपूर्ण नवसारी जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्याला सुरुवात केली आहे. ‘नवसारी जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून पंढरपूर-मंगळवेढा तसेच गोवा विधानसभा निवडणुकीचा अनुभवाचा वापर करून संपूर्ण नवसारी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी विजय प्राप्त करेल असा विश्वास देतो’, असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे. ( BJP Former State Minister MLA Bala Bhegde Responsibility Navsari District Gujarat State Assembly Election 2022 )
अधिक वाचा –
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध
Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके