वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाइस चेअरमनपदी भारतीय जनता पार्टीचे पंढरीनाथ भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. व्हाइस चेअरमन निलेश म्हाळसकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पंढरीनाथ जयराम भिलारे यांचा एकमेव अर्ज आल्याने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ढोरे यांनी भिलारे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी संस्थेच्या सभागृहात पंढरीनाथ भिलारे यांचा सत्कार करण्यात आला. ( BJP Leader Pandharinath Bhilare Elected As Vice Chairman Of Vadgaon Various Executive Services Cooperative Society )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रसंगी संस्थेचे संचालक किसनराव भेगडे, सुभाष ढोरे, अजित वहिले, प्रकाश कुडे, किसनराव वहिले, गणेश भालेकर, सचिव रमेश गाडे यांच्या उपस्थिती मध्ये निवड जाहीर झाली. यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मा चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे, शंकरराव भिलारे, नारायणराव ढोरे, सोमनाथ काळे, वसंतराव भिलारे, प्रविण चव्हाण, दिनेश ढोरे, प्रसाद पिंगळे, किरण भिलारे, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, भूषण मुथा, रविंद्र म्हाळसकर, नितीन कुडे, प्रशांत चव्हाण, मकरंद बवरे, प्रशांत भिलारे, नवनाथ भिलारे, संतोष भिलारे, सुर्यकांत भिलारे, मोहन भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते. कल्पेश भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले आणि विनायक भेगडे यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– राजकारण न करता मंजूर झालेली विकासकामे लवकर मार्गी लावावी – बाळा भेगडे
– केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, शिंदे गटाला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, बारणेंचं पारडं जड