वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार सर्रास होताना दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत चालल्याची दिसत आहे आणि याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे सांगत;
वरील सर्व लांछनास्पद गोष्टींना आळा बसावा, यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा ने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागणी नगरपंचायत आणि वडगाव पोलीस चौकी येथे भाजपा महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाचे वतीने निवेदन देऊन केली आहे. ( BJP Mahila Morcha Demands Installation Of CCTV Cameras At Various Places In Vadgaon Maval City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मा उपनगराध्यक्षा नगरसेविका अर्चना म्हाळसकर, वैशाली ढोरे, अश्विनी बवरे, सुमन खेंगले, सुनिता जाधव, संगीता खेंगले, भक्ती जाधव, अक्षदा खेंगले आदी महिला मोर्चा सदस्या उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– मावळात खेळ रंगला महिलांचा, वैष्णवी रसाळ ठरल्या सौभाग्यवती 2023 च्या मानकरी, विजेत्यांना मिळाली भरघोस बक्षिसे
– महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू