व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लायन्स क्लबच्या माध्यमातून वडगाव शहरात प्रथमच पाण्याची बचत करणारे स्मार्ट टॉयलेट सुरू, काय आहे खासियत? वाचा

लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या सौजन्याने व वडगांव नगरपंचायत च्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत वडगांव शहरात नागरिकांसाठी 2 स्मार्ट टॉयलेट सुरू करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 16, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Smart-Toilet-In-Vadgaon-Maval

Photo Courtesy : BHushan Mutha


लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या सौजन्याने व वडगांव नगरपंचायत च्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत वडगांव शहरात नागरिकांसाठी 2 स्मार्ट टॉयलेट सुरू करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या अध्यक्षा सपना छाजेड यांच्या हस्ते आणि वडगांव चे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुण्याचे मा नगरसेवक आनंद छाजेड यांच्या संकल्पनेतून प्रातिनिधिक स्वरूपात हा उपक्रम श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाजवळ सुरू करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

नगरसेवक प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, प्रसाद पिंगळे, वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन पंढरीनाथ भिलारे, वडगांव शहर भाजपा सरचिटणीस मकरंद बवरे, एम इ एस इंडस्ट्रीयल कामगार सह. पतसंस्थेचे संचालक संतोष ढोरे, मावळ तालुका भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, नगरपंचायत वडगांव चे स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे दिगंबर बांडे, नूतन मुथा, शर्मिला खांडके, विजय झनकर आदी मान्यवर उपस्थित होते. ( Smart Toilets Started In Vadgaon Maval City Under Majhi Vasundhara Abhiyan 3.0 And Swachh Survekshan 2023 Through Lions Club of Vadgaon )

हेही वाचा – आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न

इको बडी स्मार्ट सोल्युशन आणि ऑप्टिस्मार्ट इको सोल्युशन या कंपनीने तयार केलेल्या या स्मार्ट टॉयलेट मध्ये माझी वसुंधरा अंतर्गत

जल – पाण्याची बचत : एका वापरासाठी साठी अंदाजे फक्त 1 लिटर पाणी वापर होतो.

पृथ्वी – प्लास्टिक चा पुनर्वापर : हे टॉयलेट प्लास्टिक च्या पुनर्वापर करून तयार केलेल्या पार्टिशन व वापरलेल्या प्लास्टिक पासून बनवलेले आहेत.

अग्नी : सौर ऊर्जा वर देखील हे सुरू राहू शकते असे हे तीन तत्त्व यांत समाविष्ट आहे.

तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत प्लॅटिक चा पुनर्वापर केल्या मुळे 3 आर प्रिन्सिपल समाविष्ट आहे.

नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या उपक्रमांचे कौतुक करत नगरपंचायत देखील लायन्स क्लब ऑफ वडगांव सोबत सेवाकार्ये करण्यासाठी सदैव सहकार्य करेल असे आश्वासन दिले. नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी आपल्या मनोगतात 5 प्रमुख सूत्रांच्या माध्यमातून विशेषतः पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असल्याने समाधान व्यक्त केले.

हेही वाचा – दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या वडगाव मावळमधील एकाला पुण्यात अटक । Pune Crime

संवेद खांडके यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती विशद केली. लायन्स क्लब ऑफ वडगांव चे खजिनदार नंदकिशोर गाडे, संचालक झुंबरलाल कर्णावट, अमोल मुथा, संजय भंडारी, अ‍ॅड.चंद्रकांत रावल, संजय गांधी, प्रशांत गुजराणी, आदेश मुथा, वितराग मुथा आदींनी नियोजन केले. स्वागत लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या अध्यक्षा सपना छाजेड यांनी केले. प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ वडगांव चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. दामोदर भंडारी यांनी केले ज्यात त्यांनी लायन्स क्लब ऑफ वडगांव च्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मा नगरसेवक भूषण मुथा यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष चेट्टी यांनी केले.

अधिक वाचा –

– शास्ती कर माफ करा, ग्रामपंचायत काळातील बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपाचे नगरपंचायत सीईओंना निवेदन
– छत्रपती शिवरायांचा 393वा शिवजन्मोत्सव सोहळा वडगाव इथे थाटामाटात संपन्न, पुरस्कारार्थ्यांना पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न

Next Post

तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pinkathon-Rally-In-Talegaon-Dabhade

तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.