जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅन्सर विरुद्ध लढा आणि प्रतिबंध जनजागृती करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि टीजीएच ओंको लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दिनांक 19 मार्च) पिंकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी चित्रपट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन होणार आहे. मारुती मंदिर चौक ते कॅन्सर सेंटर अशा 3 किलोमीटरच्या या उपक्रमात सुमारे 814 महिलांची नोंदणी केली आहे. रॅलीच्या शेवटी विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ( Pinkathon Rally In Talegaon Dabhade City Organized By Nagar Parishad Rotary Club And TGH Onco Life Cancer Center )
सदर पत्रकार परिषदेवेळी गणेश खांडगे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे (पोतदार), डॉ. मनोज तेजानी, क्लब अध्यक्ष दीपक फल्ले, डॉ. विद्या पोतले आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त महिलांनी या जनजागृती रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले.
अधिक वाचा –
– लायन्स क्लबच्या माध्यमातून वडगाव शहरात प्रथमच पाण्याची बचत करणारे स्मार्ट टॉयलेट सुरू, काय आहे खासियत? वाचा
– आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न