निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी कल्हाट येथील रविंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या व्हाईस चेअरमन संजनाबाई करवंदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोसायटीचे अध्यक्ष संतोष करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली होती. यावेळी रविंद्र पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने, व्हाईस चेअरमनपदी रविंद्र सगाजी पवार बिनविरोध निवडणूक आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिव तुषार गाडे यांनी जाहीर केले. ( Ravindra Pawar Kalhat has been elected unopposed Vice Chairman of Nigde Various Executive Services Cooperative Society )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संचालक रामचंद्र थरकुडे, शिवाजी करवंदे, काळू पवार, दत्तात्रय भांगरे, नथुभाऊ भागवत, बाबाजी साळवे, शंकर पवळे, मारुती शिवेकर आदी संचालक यावेळी उपस्थित होते.
एस.आर.पी. तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, निगडे ग्रामपंचायत सरपंच भिकाजी भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिगंबर आगविले, माजी सरपंच तानाजी करवंदे, देविदास भांगरे, सुभाष पिंगळे, मारुती भांगरे, उपसरपंच गणेश बांगरे, उद्योजक विशाल चव्हाण, मनोज करवंदे, सुनील पवार यासह उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन रविंद्र पवार यांचा सत्कार केला आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी
– लायन्स क्लबच्या माध्यमातून वडगाव शहरात प्रथमच पाण्याची बचत करणारे स्मार्ट टॉयलेट सुरू, काय आहे खासियत? वाचा