भाजपचे पक्षनिष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज (मंगळवार, 3 जानेवारी) रोजी निधन झाले. लक्ष्मण जगताप यांचे कर्करोग सारख्या दुर्धर आजाराने वयाच्या 59व्या वर्षी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांना भारतीय जनता पार्टी मावळ यांच्याकडून पक्ष कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाने भाजपा परिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! भाजपाचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन