मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याअंतर्गत आणि खासदार स्थानिक विकास निधीतून तीर्थक्षेत्र देहूगाव परिसरामध्ये विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे. तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांचे शुभहस्ते रविवारी (दि 1 जानेवारी) झाले. तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी देहूकरांना दिली. ( Bhoomipujan By MP Shrirang Barne For Various Development Works At Shri Kshetra Dehu village )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्यपहार अर्पण करून झाली. देहू हद्दीतील समर्थनगर, देहूगाव जुनपालखी मार्ग, ओंकार सोसायटी, भैरवनाथ नगर, व्यंकटेश सोसायटी, शिवनगरी सोसायटी, राजमाता जिजाऊ सोसायटी, गंधर्व विहार सोसायटी, विठ्ठलनगर येथील राजमुद्रा सोसायटी व श्री विघ्नहर्ता सोसायटी येथील अंतर्गत रस्त्यांच काँक्रीटी करणाचे भूमीपूजन झाले. त्याचबरोबर माळीनगर येथील सभामंडपाचे, शिवनगरी येथील पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण झाले. देहू परिसरात चार हायमास्ट दिवे खासदार निधीमधून देण्यात आले. त्याचेही भूमीपूजन करण्यात आले.
देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शीतल हगवणे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उप जिल्हाप्रमुख शरद हुलावळे, नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण समिती सभापती सपना मोरे, नगरसेविका ज्योती टिळेकर, पुजा काळोखे, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजू खांडभोर, संघटक सुनील मोरे, माजी जिल्हापरिषद सदस्य माऊली काळोखे, भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकराव साकोरे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख निलेश तरस, उद्योजक मिलिंद अच्युत, रविंद्र ब्रम्हे उपस्थित होते.
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना देहूशहर शाखा बोर्डचे उद्धघाटन खासदार बारणे व पदाधिकाऱ्यांचे शुभहस्ते करण्यात आले. नगरविकास विभाग, खासदार बारणे यांच्यामाध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने देहूकरांनी समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा –
– माजी नगरसेवकासह 100हून अधिक कार्यकर्त्यांचा खासदार बारणेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
– मोठी बातमी! भाजपाचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन