Dainik Maval News : राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज ( दि. 17 ऑक्टोबर ) अल्प आजाराने निधन झाले. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मात्र, त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणातील एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आमदार कर्डिले यांना पहाटे त्रास जाणवू लागला. त्यांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगर -नेवासा आणि राहुरी मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. ते सहाव्यांदा आमदार होते.
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं सांगत आमदार रोहित पवार यांनी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली आहे.
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख… pic.twitter.com/IKXzPNmG8t
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 17, 2025
माजी मंत्री, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समजली. अनेक वर्षे आम्ही विधानसभेत सोबत काम केलं.
एक सेवाभावी लोकप्रतिनिधी आणि दिलदार मित्र आज अकाली काळाच्या पडदयाआड गेला. त्यांच्या निधनाने कर्डिले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी कर्डिले… pic.twitter.com/6RKJPfygA6— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 17, 2025
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या निधनाच्या वृत्ताने मन अत्यंत व्यथित झाले आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले मोलाचे कार्य कायम आठवणीत राहील.
अल्पशा आजाराने त्यांचं असं अकाली जाणं हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, pic.twitter.com/KSJDRWPzg8— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) October 17, 2025
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषद निवडणूक : जिल्हा परिषदेच्या 73 सदस्य पदाकरिता गटनिहाय आरक्षण सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– अध्यक्षपद राहिले दूर, सदस्य होण्याचेही स्वप्न भंगले ! जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीनंतर मावळच्या राजकारणात उलथापालथ
– मोठी बातमी ! नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
– जमीन मोजणीसाठी आता सहा महिने वाट पाहावी लागणार नाही ; ३० दिवसांत होणार जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा