Dainik Maval News : कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहर येथे भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
माजी जि.प. सभापती बाबुराव (आप्पा) वायकर यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा व मावळ तालुक्यातील अनेक कामे पार पडली. त्यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यात व परिसरात अनेक विकासकामे पूर्ण झाली असून त्यांच्या अनुभवाचा फायदा येणाऱ्या काळात कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटासाठी होणार असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले.
तसेच, सर्वांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कार्ला – खडकाळा गटात भाजपा पक्षाकडून इच्छुक उमेदवार असलेल्या आशाताई बाबुराव (आप्पा) वायकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम करत त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

