Dainik Maval News : मावळ विधानसभेतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची लक्षणे आहेत. कारण, ‘आमचं ठरलंय’ आणि ‘कमळ हाच आमचा उमेदवार’ अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील पंचवार्षिक निवडणूक सोडली तर, मावळ विधानसभेत सदासर्वकाळ भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व राहिले आहे. सध्याचे विद्यमान आमदार भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले. त्यामुळे भाजपाची प्रचंड ताकत असलेल्या या मतदारसंघात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे, निवडणूक प्रमुख भाजपा मावळ विधानसभा रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
प्रत्येक गावात जात भाजप कार्यकर्ते जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधत भाजप विचारांच्या नागरिकांना साद घालत आहे. गावभेट दौऱ्यात सुरुवातीला चांदखेड ,कुसगाव ,आढले खु, दारुंब्रे,आढले बु सांगवडे , डोणे, गहुंजे ,गोडूंब्रे ,पुसाने ,पाचाणे , ओवळे , सांळुब्रे ,दिवड , शिरगाव या गावांना भेटी देऊन , ग्रामस्थांशी आणि मतदारांशी संवाद साधण्यात आला.
याप्रसंगी ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, नितीन मराठे, नितीन घोटकुले, अभिमन्यू शिंदे, रघुवीर शेलार, बाळासाहेब घोटकुले, जितेंद्र बोत्रे, रामदास गाडे, संभाजी म्हाळसकर, दत्तात्रेय माळी, गणेश धानिवले, किरण राक्षे, माऊली आडकर, माऊली ठाकर, बाबुलाल गराडे, रामभाऊ गोपाळे, प्रनेश नेवाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , आजी-माजी सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन, संचालक व नागरिक , बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP preparation for Maval Vidhan Sabha elections Village visit tour started )
अधिक वाचा –
– स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज – आमदार सुनिल शेळके
– राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा ; केंद्र शासनाकडून कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी
– ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ; ३१ जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू