Dainik Maval News : सोमवारी ( दि. ३ नोव्हेंबर ) भारतीय जनता पक्षाकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तळेगाव निवडणूक प्रभारी गणेश भेगडे, शहराध्यक्ष चिराग खांडगे यांसह पक्षाची कोअर कमिटी सदस्य याप्रसंगी उपस्थितीत होते. मुलाखती नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेत्यांनी संतोष दाभाडे पाटील यांच्या नगराध्यक्ष पदासाठी काही अटीशर्तींसह संमती दाखवली
सोमवारी घेतलेल्या मुलाखतीत भाजपाकडे एकूण १४ प्रभागांत नगरसेवक पदांसाठी ७६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. तर नगराध्यक्षपदासाठी एकूण ४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात पक्षाचे माजी शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, गणेश भेगडे, किशोर भेगडे आणि गिरीश खेर यांचा समावेश आहे. लवकरच या उमेदवारांमधून सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर केले जातील, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी संतोष दाभाडे पाटील यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मकता दाखवल्याने याबद्दल भाजपा नेत्यांना विचारणा केली असता, त्यांनी आपले म्हणणे मांडले.
संतोष दाभाडे – पाटील यांच्या नावाला पाठींबा, पण…
निवडणुक प्रभारी गणेश भेगडे यांनी याप्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले., “आमदार महोदयांनी प्रस्ताव दिला होता की, संतोष दाभाडे पाटील हे जर महायुतीचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. तर आज मी सर्वांच्या माध्यमातून सांगतो संतोष दाभाडे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, शहराचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आमची देखील संतोष दाभाडे पाटील यांच्या नावाला संमती आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जर एका व्यासपीठावर येऊन किंवा एकत्र येऊन यावर सविस्तर चर्चा झाली, तर निश्चित त्यावर पुढे मार्ग निघतील. ते जर हे नाव सुचवत असतील आणि पुढे योग्य तोडगा निघत असेल तर निश्चितच संतोष दाभाडे पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा सगळ्यांचा पाठिंबा असेल.” असे गणेश भेगडे म्हणाले.
एकंदरीत तळेगाव दाभाडे शहरात युती होणार की नाही, यावर संतोष दाभाडे यांची उमेदवारी अवलंबून असणार, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


