दिवड गावातील अनेक स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 26 ऑक्टो) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘गावाच्या हितासाठी सर्वजण एकत्र आलात याबद्दल अभिनंदन. सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनापासून स्वागत करतो.’ असे आमदार शेळके यावेळी म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महेंद्र राजिवडे, देविदास सावळे, सचिन राजिवडे, संतोष राजिवडे, अनिल राजिवडे, अमर राजिवडे, हनुमंत राजिवडे, बाळू राजिवडे, रामदास बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच लहू सावळे, नामदेव सावळे, माजी उपसरपंच रोहिदास सावळे, शंकर कदम, दत्ताभाऊ सावळे, प्रकाश राजिवडे, दिपकभाऊ सावळे, भागुजी सावळे, अमोल सावळे तसेच दिवड गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( BJP workers of Diwad village joined NCP party In presence of MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत
– बिअर बारचे लायसन्स काढून देतो असे सांगून एकाची 9 लाख 58 हजाराची फसवणूक; गहुंजे गावातील प्रकार
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत