व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल विकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी सायंकाळी शहर पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 27, 2023
in लोकल, शहर
लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर

Photo Courtesy : Vishal Padale


लोणावळा शहर पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी विशाल पाडाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल विकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी सायंकाळी शहर पत्रकार संघाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमुखाने ही निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

माजी अध्यक्ष विशाल विकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला माजी अध्यक्ष निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, बंडू येवले, प्रशांत पुराणिक, प्रदीप वाडेकर, नितीन तिकोने, संतोषी तोंडे, संजय हुलावळे, दीपक तारे, नरेश बोरकर, मनोज गवळी हे उपस्थित होते. बैठकीत पत्रकार संघाने विशाल विकारी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत निर्माण झालेला कोविड संघर्षाचा काळ तसेच त्यानंतरच्या काळात केलेल्या दैदीप्यमान कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर अध्यक्षपदासाठी सर्वानुमते विशाल पाडाळे यांचे एकमेव नाव पुढं आल्याने बैठकीचे अध्यक्ष विशाल विकारी यांनी विशाल पाडाळे यांची एकमताने निवड झाली असल्याचे घोषित केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल पाडाळे यांनी नूतन कार्यकारणी देखील घोषित केली. यामध्ये;
नितीन तिकोणे (कार्याध्यक्ष)
प्रदीप वाडेकर (उपाध्यक्ष)
प्रशांत पुराणिक (सचिव)
नरेश बोरकर (खजिनदार)
संतोषी तोंडे (सह सचिव)
मनोज गवळी (सह खजिनदार)
यांच्या निवड जाहीर करण्यात आल्या.

विशाल पाडाळे यांची कारकीर्द –

विशाल पाडाळे हे लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेत ते कार्यरत आहे. मागील 16 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी दैनिक केसरी पासून पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे दैनिक पुढारी, दैनिक प्रभात यासह TV9, झी24तास या वृतवाहिण्यांसाठी देखील काम केले आहे. यासह सह्याद्री दर्पण, हवापालट, जगावेगळे असे विविध पोर्टल व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते पत्रकारिता करीत असतात. मागील अनेक वर्षांचा त्यांना पत्रकारितेतील अनुभव असल्याने ते नक्कीच पत्रकार संघाला एक नवीन दिशा देतील अशी सर्वांना खात्री आहे. पत्रकार संघातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघाची वाटचाल करणार असल्याचे विशाल पाडाळे यांनी यावेळी नमूद केले.

( Vishal Padale elected as President of Lonavla City Journalists Association )
अधिक वाचा –
– बिअर बारचे लायसन्स काढून देतो असे सांगून एकाची 9 लाख 58 हजाराची फसवणूक; गहुंजे गावातील प्रकार
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ


Previous Post

कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी

Next Post

दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA-Sunil-Shelke

दिवड गावात भाजपाला खिंडार; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.