Dainik Maval News : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मावळ – मुळशी तील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा २८ वा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ उत्साहात संपन्न झाला. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असून उपलब्ध क्षेत्रात ऊस लागवड वाढविण्याची जबाबदारी संचालक मंडळाची आहे. त्यादृष्टीने संचालक मंडळाने पावले उचलावीत असे प्रतिपादन भोर, मुळशी, राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांनी कारखान्याच्या २८ वा गळीत हंगामाच्या बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभात केले.
कारखान्याचा सन २०२५- २०२६ या हंगामाचा २८ वा गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ कारखान्याचे संचालक उमेश बाळासाहेब बोडके व त्यांच्या पत्नी मोनिका उमेश बोडके तसेच संचालक दत्तात्रय गोपाळ जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते व देहु संस्थानचे अध्यक्ष हभप जालींदरमहाराज मोरे(इनामदार) यांच्या अधिपत्याखाली तसेच अध्यक्ष नानासाहेब नवले, मुळशी,भोर,राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे,संचालक माऊली दाभाडे,चेतन भुजबळ ,धैर्यशील ढमाले,धोंडीबा भोंडवे,राजेंद्र कुदळे,दत्तात्रय उभे,छबुराव कडू,यशवंत गायकवाड,संदीप काशिद,विलास कातोरे,भरत लिम्हण, अतुल काळजे,शिवाजी कोळेकर,लक्ष्मण भालेराव, संचालिका ज्योती अरगडे,शोभा वाघोले,ज्ञानेश नवले, देहु देवस्थानचे विश्वस्त उमेश मोरे ,माजी संचालक सुभाष बोडके,शांताराम इंगवले,कार्यकारी संचालक एस.जी.पठारे,प्रभारी सचिव मोहन काळोखे तसेच कारखान्याचे कर्मचारी आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोण होणार तुमच्या शहराचा नगराध्यक्ष? राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर – पाहा संपूर्ण यादी
– पुणे जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी प्रसिद्ध होणार
– लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव मावळ, देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर – पाहा एका क्लिकवर