तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर ( Instagram ) स्टेटस ठेवल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून एकाला बेदम मारहाण ( Boy Beating By Group ) करत जीवे मारण्याची धमकी ( Crime ) दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील दोन जणांना अटक केली आहे. शनिवार (दिनांक 3 डिसेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास तळेगावमधील टेल्को कॉलनी येथे ही घटना घडली. ( Boy Beating By Group For Posting Status On Instagram Talegaon Dabhade Crime )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी एका तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (रविवार, 4 डिसेंबर) रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास कनकुटे (वय 25, रा. कातवी, ता. मावळ), साहील सोनवणे (वय 22, रा. वडगाव मावळ), निलेश सोपान कनकुटे (वय 24, रा. कातवी गाव, तळेगाव एमआयडीसी) आणि अन्य 3 जणांवर भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 323, 452, 504, 506बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींपैकी विकास कनकुटे आणि निलेश कनकुटे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा – महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे..’ शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाने इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून आरोपी हे ग्रुपने शनिवारी रात्री दुचाकीवरून घरी आले. जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– शिळींब गावातील आदिवासी समाजातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी मंगळवारी (6 डिसेंबर) विशेष कॅम्प
– पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 7 डिसेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन । Ferfar Adalat