मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (शनिवार, 1 एप्रिल) पहाटेच्या सुमारास ट्रकचा अपघात झाला. खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवर किलोमीटर 37.00 दरम्यान हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ( Braking Accident Involving Truck And Container On Mumbai Pune Expressway In Khopoli Police Station Area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, ट्रक (क्रमांक TN-72CV-3123) यावर असलेल्या चालकाचे (नाव – फ्रान्सीस) ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरच्या अज्ञात कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या जोरदार धडकेने ट्रकच्या समोरील बाजू दबली गेली आणि त्यात चालक अडकून पडला. सदर अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणा आदी यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
बचाव यंत्रणांनी अथक प्रयत्न करुन चालकाला सुखरुप केबीनमधून बाहेर काढले. मात्र जोरदार धडकेत चालकाच्या दोन्ही पायास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली, त्यामुळे त्याला लोकमान्य आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिकेने तत्काळ एमजीएम अशोक हॉस्पिटल कामोठे इथे रवाना केले गेले. बोरघाट वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
– लायन्स पॉइंट इथे 600 फूट खोल दरीत पडून मुलाचा मृत्यू, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात शिवदूर्ग टीमला यश