व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्री शिवनेरी बसचा अपघात! 7 जण जखमी, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दिनांक 4 जुलै) रोजी मध्यरात्री 11:30 वाजताच्या सुमारास शिवनेरी बस आणि ट्रकचा अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 5, 2023
in महाराष्ट्र
Shivneri-Bus-Accident

Photo Courtesy : Gurunath Sathelkar


मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दिनांक 4 जुलै) रोजी मध्यरात्री 11:30 वाजताच्या सुमारास शिवनेरी बस आणि ट्रकचा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर कि.मी. 37.00 जवळ हा अपघात झाला, ज्यात शिवनेरी बसने (क्र. MH 12 VF 3924) ट्रकला (क्र. MH 10 DT 4293) पाठी मागून धडक दिली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिवनेरी बस चालक विकास लाड (वय 40 वर्षे, रा.पुणे) हा स्वारगेट ते ठाणे या बस मधून 06 प्रवाशांसह एक्सप्रेस वे वर प्रवास करत असताना त्याचे किलोमीटर 37.00 च्या दरम्यान उतारावर बस वरील नियंत्रण सुटल्याने तिसऱ्या लेनमधून चालणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसची केबिन दबल्याने बस चालक आत अडकला होता. ( Braking News Shivneri bus and truck accident at midnight on Mumbai Pune Expressway )

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीम मेंबर्सनी त्याला कसोशीने प्रयत्न करून बाहेर काढले. त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरिता लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स मधून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना केले आहे.

तसेच बस मधील इतर 06 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असल्याने पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत हे अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिस हद्दीतील कार्ला ते लोहगड मार्गाची IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या


dainik maval jahirat

Previous Post

“वडगाव नगरपंचायतचा कारभार रामभरोसे नाही तर चोर-भरोसे” : सायली म्हाळसकर

Next Post

‘त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही..शरद पवार हेच खणखणीत नाणं..जे गेलेत त्यांची चिंता करु नका..’, वाचा शरद पवारांचे संपूर्ण भाषण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sharad-pawar

'त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही..शरद पवार हेच खणखणीत नाणं..जे गेलेत त्यांची चिंता करु नका..', वाचा शरद पवारांचे संपूर्ण भाषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.