ब्राझीलचे स्टार आणि दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरूवारी (30 डिसेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची गणना फुटबॉलच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामवरून हे वृत्त दिले. पेले मागील काही काळापासून कॉलन कर्करोगाशी (कॅन्सर) झगडत होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. ( Brazilian football legend Edson Arantes do Nascimento, famously called Pele has passed away aged 82 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पेले यांची मुलगी नॅसमेंटोने इंस्टाग्रावर लिहिले, आम्ही आज जे काही आहे हे तुमच्यामुळे. आमचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. रेस्ट इन पीस. पेले यांना 2021मध्ये ट्युमरचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर केमोथेरपी सुरू होती.
FIFA and all of the football world is mourning the death of O Eterno Rei – the eternal king.
Rest in peace, Pelé. Our thoughts and sympathies are with your family, friends and all who had the joy of watching you play.
— FIFA (@FIFAcom) December 29, 2022
काही दिवसांपूर्वीच पेले यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकारऊंटवरून मेस्सी आणि अर्जेंटिनाचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांनी अंतिम सामन्यात हॅट्ट्रीक करणाऱ्या कायलिन एमबाप्पे याचेही कौतुक केले होते. तीन फुटबॉल विश्वचषक जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी सॅंटोस एफसीकडून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली आणि वयाच्या 16व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला.
अधिक वाचा –
– वेदांता-फॉक्सकॉन मुद्द्यावर आमदार सुनिल शेळके विधानसभेत आक्रमक, भरपाई कशी करणार? सरकारला सवाल
– “महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी..!”