मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बोरज गावाच्या हद्दीत मंगळवार रोजी (दिनांक 4 एप्रिल) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून अन्य दोन जण गंभीर जखमी झालेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर 65/400 वर मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा गंभीर अपघात झाला. जनार्दन वामन सावंत (वय 61) आणि श्रीकांत मुरलीधर सावंत (वय 48, दोघेही रा. मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर, अश्विनी राणे (वय 54) आणि आर्य श्रीकांत सावंत (वय 20) हे दोघे अपघातात जखमी झाले आहेत. ( Breaking News car and truck Fatal accident on Mumbai Pune Expressway near Boraj village limits 2 killed )
हेही वाचा – मोठी बातमी : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात
प्राप्त माहितीनुसार; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास बोरज (ता. मावळ) गावच्या हद्दीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारची ( क्रमांक एमएच 02 एफजे 7797) टेम्पो (क्रमांक एमएच 43 बीपी 6601) भीषण धडक बसली. यात दोघांना आपला जीव गमवावा लागला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने सदर अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : शिरगाव सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांना तपासात मोठे यश, प्रमुख हल्लेखोर आरोपींना सिनेस्टाईल अटक
– व्हिडिओ : बळीराजामुळे वाचले कासवाचे प्राण, वन्यजीव रक्षक मावळच्या प्राणीमित्राची तत्काळ मदत । तळेगाव दाभाडे