मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण साहेबराव गोपाळे यांची दिनांक 1 एप्रिल, शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास शिरगावातील साईबाबा मंदिरासमोरील चौकात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ माजली होती. या घटनेतील चार संशयित आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या घटनेतील प्रमुख हल्लेखोर आरोपींना गजाआड केले आहे. ( Breaking Shirgaon sarpanch Murder Case Big Success For Police Main Attacker Accused Arrested From Hinewadi )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे शिरगाव, प्रति शिर्डी मंदिराच्या समोरील रोडवर शिरगावचे सरंपच प्रविण साहेबराव गोपाळे (रा शिरगाव ता मावळ जि पुणे) हे मंदिराचे समोर त्यांच्या मोटार सायकल वर बसले होते. तेव्हा 3 अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची निघृण हत्या करुन ते पसार झाले.
त्या अनुषंगाने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त फिर्यादीवरुन भादवी 302, 120 (ब), 34 प्रमाणे सदर आरोपींवर दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच, शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोउपनि गाडीलकर, पोहवा टी. सी. साबळे, पोना एस. बी. घाडगे, पोना बाय जे. नागरगोजे, पोअंम एस. एल. फडतरे व पोअंम डी व्ही राठोड हे या तपास पथकात होते.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना वपोनि वनिता धुमाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे हिंजवडी कासारसाई रोडला डोंगराच्या बाजुला थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोउपनि गाडीलकर, पोहवा टी. सी. साबळे, पोना एस. बी. घाडगे, पोना वाय. जे. नागरगोजे, पोअंम एस. एल. फडतरे आणि पोअंम डी.व्ही. राठोड यांनी जाऊन सापळा रचून अतिशय शिताफिने यातील लपून बसलेल्या ठिकाणावरुण एकुण 3 आरोपींना ताब्यात घेतले. ( Breaking Shirgaon sarpanch Murder Case Big Success For Police Main Attacker Accused Arrested From Hinewadi )
आरोपींची चौकशी केली असता सदरहू त्यांना गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे 1) विशाल ऊर्फ किरण सुनिल गायकवाड (वय 25 वर्षे, रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) 2) संदिप ऊर्फ अण्णा छगन गोपाळे (वय 31 वर्षे, रा शिरगाव, ता मावळ, जि पुणे) 3) ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22 वर्षे, रा शिरगाव, ता मावळ जि पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत असून सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहेत.
अधिक वाचा –
– शिरगाव सरपंच हत्या प्रकरण : अटक केलेल्या आरोपींवर मोठी कारवाई, वाचा सविस्तर
– मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या