मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे हे शिरगाव गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच होते. काही दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायत संपूर्णतः बिनविरोध आल्याने जिल्ह्यात याची मोठी चर्चा झाली होती. ( Current NCP Sarpanch of Shirgaon Village Praveen Gopale Murdered Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे हे आज ( शनिवार, दिनांक 1 एप्रिल ) रोजी रात्री उशीरा शिरगाव चौकात आले असता, त्यांच्यावर टोळक्यांनी हल्ला केला. यात सरपंच प्रविण गोपाळे हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र, यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शिरगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने पोलिस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. मात्र, सरपंचाची भर चौकात हत्या झाल्याने गावात तणावयुक्त भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेच्या अंधारात अपघात, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि…
– मोठी बातमी : ‘दिल्लीत ये, तुला उडवून टाकतो’, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी