Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे भावाभावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडगाव येथे सख्खा भाऊ हाच आपल्या भावाचा पक्का वैरी ठरला असून घरगुती किरकोळ वादाच्या कारणावरुन भावानेच भावाचा जीव घेतला आहे.
तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस, या कारणावरून सख्ख्या भावाने चाकूसारख्या धारदार शस्त्राने छातीवर वार करून मोठ्या भावाचा खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या जागेत घडली.
उदेश पारधी उर्फ उदेश नबाब राजपूत (वय ४५, मूळ रा. मूरवाडा स्थानक, जि. कटनी, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. नटू शबस्ता नबाब राजपूत (वय ४०) असे आरोपी भावाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उदेश पारधी राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्खे भाऊ आहेत. ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्थानकाच्या मोकळ्या जागेत राहत होते. उदेश यांच्या मुलीची मुलगी आरोपी त्याच्या मुलासाठी मागत होता. त्यातून शुक्रवारी त्यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेल्याने नटू याने मोठ्या भावाला चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करत ठार मारले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वडगाव मावळ पोलिस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News