Dainik Maval News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आज (सोमवार, दि. 10 मार्च) विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुपारी 2 च्या सुमारास अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. ( Maharashtra Budget 2025 )
उपमुख्यमंत्री पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
- शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा आहेत.
अजित पवार विक्रमाच्या वाटेवर
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) अर्थसंकल्प सादर केला आहे. ( budget of devendra fadanvis government Ajit Pawar 11th as Finance Minister Maharashtra Budget 2025 )
सर्वाधिक अर्थसंकल्प कुणी सादर केले?
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास पाहता आजपर्यंत सादर झालेल्या एकूण 78 अर्थसंकल्पांपैकी सर्वाधिक 13 अर्थसंकल्प हे माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांनी सादर केले आहेत. शेषराव वानखेडे सर्वप्रथम 1957 साली मुंबई प्रांत निवडणुकीत तर 1962 साली संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीत कमवेश्वर मतदारसंघातून सर्वप्रथम निवडून आले होते.
कुणी किती वेळा अर्थसंकल्प सादर केला?
बॅ. शेषराव वानखेडे – 13
अजित पवार – 10 (आज 11व्यांदा)
जयंत पाटील – 10
सुशीलकुमार शिंदे – 9
बॅ. रामराव आदिक – 7
सुधीर मुनगंटीवार – 6
मधुकरराव चौधरी – 5
यशवंतराव मोहिते – 4
एकनाथ खडसे – 3
स. गो. बर्वे – 2
महादेव शिवणकर – 2
दिलीप वळसे पाटील – 2
शंकरराव चव्हाण – 1
देवेंद्र फडणवीस – 1
गोपीनाथ मुंडे – 1
सुनील तटकरे – 1
डॉ. व्ही. सुब्रह्मण्यम – 1
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका