टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : आंदर मावळ मधील सावळा इथे बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी संतोष कदम यांच्या बैलाचा मृत्यू झाला. बैलपोळा सणाच्या आगोदर हा बैल आठ दिवस अगोदर आजारी पडला होता. वडगाव येथील पशु वैद्यकीय डॉक्टर शिकलगार यांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर डॉक्टर शिकलगार यांनी येऊन बैलावरती उपचार केले, औषधे, इंजेक्शन देऊन गेले. ( bull died on day of Bailpola festival in Savala village Maval taluka )
मात्र आठ दिवसांमध्ये बैलाच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही. परिणामी ऐन सणासुदीमध्ये बळीराजाचा सर्वात मोठा असणारा सण बैलपोळाच्या दिवशीच त्या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान त्या शेतकऱ्याचे जवळपास 30 हजाराचे नुकसान झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शेतकरी काय म्हणाले?
माझा बैल हा बैलपोळा सणाच्या अगोदर आठ दिवस आजारी पडला होता. त्यासंदर्भात वडगाव मावळ पंचायत समिती पशुवैद्यकीय विभाग या ठिकाणी माहिती कळवली. त्यानंतर त्या विभागातील डॉक्टर शिकलगार हे आमच्या सावळा या ठिकाणी पोचले बैलावरती त्यांनी उपचार केले. औषधे दिली पुन्हा येतो म्हणून सांगितले मात्र आठ दिवस होऊन गेले, त्या त्यानंतर बैलाची प्रकृती गंभीर झाली.
वेळेत उपचार न मिळाल्याने बैल मृत्यू पावला ‘तरी देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर आले नाही’. मला एक तर शासकीय विभागाकडून बैल मिळावा किंवा त्याची 30 हजार किंमत मिळावी. माझी परिस्थिती खूप हलाकीची आहे. (सावळा येथील शेतकरी संतोष कदम)
अधिक वाचा –
– रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक; खासदार श्रीरंग बारणेंची माहिती
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार