Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील एका भागात भर दिवसा जबरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी अवघ्या दोन तासात एका घरात घरफोडी करत तब्ब्ल सात लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. बुधवारी (दिनांक 31 जुलै) रोजी सेवाधाम हॉस्पिटल जवळील सक्सेस चेंबर येथे ही घटना घडली. याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथील एका सरकारी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने फिर्यादींच्या घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातून 6 लाख 88 हजार 750 रुपयांचे 27.55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपयांचा कॅमेरा, 4 हजार 500 रुपये रोख असा एकूण 6 लाख 98 हजार 250 रुपयांची चोरी केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ( Burglary at Talegaon Dabhade 7 lakh worth of goods stolen )
अधिक वाचा –
– जांबवली येथील श्री कोंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर मुंबईतील शिवभक्ताकडून चांदीचा पत्रा अर्पण । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– अखेर 22 वर्षांच्या लढ्याला यश ! शेलारवाडी आणि तळेगाव येथील डीआरडीओ संपादित जमिनींना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश