Dainik Maval News : कार्ला येथे श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर 40.500 च्या दरम्यान पुणे लेनवर हा अपघात झाला आहे.
हुंडाईची वेन्यू कार दिव्याहून कार्ला येथे श्री एकविरा दर्शनेसाठी निघाली असताना कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धूर येऊ लागला. धोक्याची चाहूल लागताच चालकाने आपली कार शोल्डर लेनवर आणली आणि सर्वजण तात्काळ गाडीतून उतरले. या घटनेत गाडी पूर्णतः जळून खाक झाली असून सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
सदर घटनेत पाच प्रवासी पैकी कोणालाही दुखापत नाही. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या येऊन आग विझवली आहे. आयआरबी पेट्रोलिंक, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महामार्गावरील बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade