कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धापरीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी केले आहे.
कृषी आयुक्तालयाच्या 11 सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सुचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे नाईकवाडी यांनी कळविले आहे. ( Call to apply till 3rd October for Krishi Sevak Recruitment know application process )
महाराष्ट्र कृषी सेवक भरतीत तब्बल 2109 जागा…
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात महभरतीचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला आता सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्हयासाठी कृषी सेवकांची नियुक्ती केली जाणार असून 14 सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये सध्या राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश असून त्यासाठीच्या एकूण 2109 कृषीसेवकांची भरती केली जाणार आहे. तर उर्वरित जिल्हयांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार! शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
– कुरुळी गावातील महिलांना विविध प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचा उपक्रम
– ‘सामान्य कुटुंबातील तरुणाची गरुडझेप’, लेखक-दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचा खास आंतरराष्ट्रीय सन्मान