हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे आणि शॉक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत यांच्या मार्फत खेड ,चाकण विभागातील मोई, चिंबली, कुरुळी, माजगाव या गावांमध्ये महिला सक्षमीकरण यावर काम करण्यात येत आहे. त्यातील कुरुळी या गावात विविध प्रकारचे मसाले बनविणे प्रशिक्षण घेण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण व सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे, त्याअंतर्गत कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 5 ऑगस्ट 2023 ते 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत महिलांना मसाला बनविणे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये एकूण 20 महिलांनी सहभाग घेतला. ( Hand in Hand India Ngo Trained Women Of Kuruli Village To Make Different Types Of Spices )
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून शितल वर्पे यांनी काम केले. तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, सुवर्णा करपे, पंढरीनाथ बालगुडे, कुरुळी गावातील बचत गटातील सदस्य उपस्थित होते. यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत कुरुळी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे आभार मानले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– विरोध कालही..आजही आणि उद्याही! पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवल्यानंतर रविंद्र भेगडेंनी स्पष्ट केली भुमिका
– पवना जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली! सरकारने हा निर्णय का घेतला? पत्रात नेमकं काय लिहिलंय? वाचा सविस्तर
– मोठी बातमी! शिंदे सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली; मावळातील नेत्यांचे अपयशी प्रयत्न