Dainik Maval News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी – चिंचवड शहर, पुणे शहर आणि औद्योगिक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुतोवाच केलेल्या तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रिंग रेल्वे मार्गास प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसत आहे.
अद्याप रेल्वे मार्गाचा डीपीआर मंजूर झालेला किंवा अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेला नसताना, केवळ संभाव्य परिस्थितीच्या आधारे विरोध होत असून तो तीव्र होत असल्याचे दिसत आहे.
तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डीपीआर लक्षात घेत या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. सदर प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव, झेंडेमळा, बोडकेवाडी, सांगुर्डी, किन्हई, हगवणे मळा, काळोखे मळा, तळवडे, निघोजे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो. या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून, त्यांच्या जमिनी, घरे, वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्ग शोधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात झेंडेमळा, बोडकेवाडी, सांगूर्डी, हगवणे मळा, काळोखे मळा या गावांतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत प्रस्तावित रेल्वे मार्ग त्वरित रद्द न केल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– शिवसेनेचे माजी आमदार, मावळमधील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई संस्थानचे संस्थापक प्रकाश देवळे यांचे निधन
– व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग : प्रस्तावित रेल्वे मार्गाला स्थानिकांचा विरोध, प्रकल्पाबाबत संभ्रम