Dainik Maval News : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनाला शनिवारी ( ९ ऑगस्ट ) १४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ही योजना कायमस्वरूपी रद्द करून बाधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील संपादनाचे शेरे काढून टाकावेत, अशी मागणी मावळ तालुका किसान मोर्चा व भूमाता शेतकरी कृती समितीने केली आहे.
पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सुभाष धामणकर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत सोरटे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार, विलास दळवी, गुलाबराव घारे, चंद्रकांत ठोंबरे, भरत ठोंबरे, चिंधू म्हस्के, बाळासाहेब शिंदे आदींनी याबाबत नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. ( Cancel the Pavana closed water channel project permanently )
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पाण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प नियोजित होता. परंतु याला मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यातूनच ऑगस्ट २०११ मध्ये द्रुतगती मार्गावर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. त्याला हिंसक वळण लागून पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अनेक आंदोल शेतकरी जखमी झाले.
दरम्यान, या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध आजही कायम आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उतऱ्यावर ‘निगडी जलशुद्धीकरण केंद्र बंद पाइपलाइनसाठी संपादित’ असे शेरे आजही आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तेथे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक काम करता येत नाही. अथवा शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या