Dainik Maval News : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच गेले २४ वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यावरती गड संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये अनेक उपक्रम हे मंचातर्फे केले आहेत. त्यामध्ये दिवाळीत किल्ले विसापूर वर शिव मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात येतो. नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिव मंदिरात दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली.
प्रथम महादेवाचा अभिषेक केला व नंतर दिपोस्तव साजरा केला हा कार्यक्रम झाल्यावर नेहमीप्रमाणे गड भ्रमंती करत असताना दारूगोळा कोठारापाशी संस्थापक सदस्य सचिन निंबाळकर यांना जमिनीतून थोडा वर आलेला गोळा दिसला. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खणले असाता तो गोळा बाहेर पडला.
सदर गोळे किल्ल्यावरील पुरातत्त्वाचे विभागाचे अधिकारी सुभाष दहिभाते व मच्छिंद्र वाघमारे यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले. किल्ले विसापूर वरती १८ साली मंचच्या कार्यकर्त्यांना तीन गोळे सापडले. १९ मध्ये कार्यकर्त्यांना दोन गोळे सापडले. आज २४ मध्ये एक गोळा सापडला. हे सहा गोळे पुरातत्व विभागाला देण्यात आले आहेत.
त्यांना विनंती करण्यात आली आहे की या ठिकाणी उत्खनन करावे. कारण सर्व गोळे हे एकाच परिसरात सापडले आहेत. विसापूर किल्ल्यावरती खूप मोठा इतिहास हा गाडलेला आहे. तो प्रकाशात आणणे हे खूप महत्त्वाचा आहे.
संपूर्ण गडावरती पुरातत्व विभागामार्फत व्यवस्थित अशी पाहणी करावी. त्यामध्ये पडलेली बांधकामे, जंगलामध्ये असलेले राजवाडे हे प्रकाशात आणावे असे आवाहन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले. तसेच लोहगड प्रमाणे विसापूर किल्ल्यालाही युनोस्कोचे मानांकन प्राप्त व्हावे असे पुरातत्त्व विभागामार्फत प्रयत्न करावे असे आवाहन टेकवडे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’