व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच गेले २४ वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यावरती गड संवर्धनाचे काम करत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 3, 2024
in लोकल, ग्रामीण
Cannons of Shiva era found at Visapur fort in Pavan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच गेले २४ वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्यावरती गड संवर्धनाचे काम करत आहेत. यामध्ये अनेक उपक्रम हे मंचातर्फे केले आहेत. त्यामध्ये दिवाळीत किल्ले विसापूर वर शिव मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात येतो. नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिव मंदिरात दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली.

प्रथम महादेवाचा अभिषेक केला व नंतर दिपोस्तव साजरा केला हा कार्यक्रम झाल्यावर नेहमीप्रमाणे गड भ्रमंती करत असताना दारूगोळा कोठारापाशी संस्थापक सदस्य सचिन निंबाळकर यांना जमिनीतून थोडा वर आलेला गोळा दिसला. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खणले असाता तो गोळा बाहेर पडला.

सदर गोळे किल्ल्यावरील पुरातत्त्वाचे विभागाचे अधिकारी सुभाष दहिभाते व मच्छिंद्र वाघमारे यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले. किल्ले विसापूर वरती १८ साली मंचच्या कार्यकर्त्यांना तीन गोळे सापडले. १९ मध्ये कार्यकर्त्यांना दोन गोळे सापडले. आज २४ मध्ये एक गोळा सापडला. हे सहा गोळे पुरातत्व विभागाला देण्यात आले आहेत.

त्यांना विनंती करण्यात आली आहे की या ठिकाणी उत्खनन करावे. कारण सर्व गोळे हे एकाच परिसरात सापडले आहेत. विसापूर किल्ल्यावरती खूप मोठा इतिहास हा गाडलेला आहे. तो प्रकाशात आणणे हे खूप महत्त्वाचा आहे.

संपूर्ण गडावरती पुरातत्व विभागामार्फत व्यवस्थित अशी पाहणी करावी. त्यामध्ये पडलेली बांधकामे, जंगलामध्ये असलेले राजवाडे हे प्रकाशात आणावे असे आवाहन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले. तसेच लोहगड प्रमाणे विसापूर किल्ल्यालाही युनोस्कोचे मानांकन प्राप्त व्हावे असे पुरातत्त्व विभागामार्फत प्रयत्न करावे असे आवाहन टेकवडे यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळके रविवारी फोडणार प्रचाराचा नारळ, मावळ विधानसभेतील महायुतीचे पदाधिकारी राहणार उपस्थित । Sunil Shelke

Next Post

लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accused arrested in Nilesh Kadu murder case at Prabhachiwadi Pavananagar Lonavala Rural Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.