Dainik Maval News : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा आणि डिफेन्स मधील करिअर संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी स्पर्धा परीक्षांना तोंड देताना शिस्त, समर्पकता आणि अभ्यासात सातत्य असेल तरच आपण सुयश मिळवू शकता असे विद्यार्थीनींना सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नकारात्मकतेपासून दूर राहावे. पुरुषी वर्चस्वाला दूर ठेवायचे असेल तर महिलांनी सक्षम होणे जरुरीचे आहे. नेशन फर्स्ट हा विचार सतत मनात असला पाहिजे. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी अंगी असलेली कला जोपासा, असा मोलाचा सल्ला सत्यसाई कार्तिक यांनी विद्यार्थीनींना दिला. ( Career guidance session by Inner wheel Club at Savitribai Phule Womens College Talegaon Dabhade )
कार्तिक साहेबांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले असून त्यांचे विचार रोजच्या जीवनात आपण सगळे अंगिकारू शकतो, असे इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष प्रवीण साठे म्हणाल्या. तर कॉलेजचे प्राचार्य मिसाळ सरांनी मुलींसाठी एमपीएससी यूपीएससी केंद्र कॉलेज मध्ये सुरू करत असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव योगवेंद्र खळदे उपस्थित होते.
योगवेंद्र खळदे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुग्धा जोर्वेकर आणि रश्मी थोरात यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. इनर व्हील क्लब तर्फे ज्योती जाधव, संगीता जाधव, नीलिमा बारटक्के, जयश्री दाभाडे, काजल गारोळे, संगीता शेडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
अधिक वाचा –
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

