Dainik Maval News : विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेच्या सासरकडील बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील मामुर्डी गावात घडली.
याप्रकरणी मंगळवारी (दि. 3) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विवाहितेचा भाऊ राम जालिंदर शेवाळकर (वय 39, रा. मामुर्डी गाव, मावळ) यांनी मंगळवारी (दि. ३) फिर्याद दिली आहे. ( case registered against twelve in-laws at Dehu Road police station for harassing married woman )
त्यानुसार सचिन कलप्पा गहाळे (वय 36), महानंदा रोहिदास बनसोडे (वय 52), स्वप्निल कलप्पा गहाळे (वय 34), अमर श्रीशैल गहाळे (वय 30), अविनाश रोहिदास बनसोडे (वय २४), रुपेश शिवलाल गहाळे (वय 30), अभिषेक श्रीशैल गहाळे (वय २१, सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याच्या कुटुंबातील इतर लोकांनी फिर्यादी यांच्या बहिणीचा छळ केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी, त्यांचे आई, वडील आणि पत्नीला हाताने, लोखंडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना दुखापत झाली आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश