Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. यात कामशेत (ता. मावळ) येथील जीजस ख्रीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेचा समावेश असून आता या अनधिकृत शाळेवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अगोदर कामशेतच्या डोंगरभागात असलेली ही शाळा काही वर्षांपूर्वी सहारा कॉलनी भागात स्थलांतरीत झाली. परंतु अद्याप शाळेने स्थलांतर प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही. त्यामुळे शासनाने ही शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले असून दंडही ठोठावला आहे.
- याबाबत मावळ तालुका शिक्षण विभागाने वारंवार शाळा प्रशासनाला नोटीस बजाविली. मात्र त्यांनी कोणताही जबाब न दिल्याने गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी कामशेत पोलिसांत तक्रार दिली असून शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या शाळेत बालवाडीपासून ते दहावी इयत्तेपर्यंत वर्ग असून जवळपास आठशे ते नऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जर ही शाळा बंद झाली किंवा शाळेवर काही कारवाई झाली तर विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान शाळा प्रशासनाने, आम्ही स्थलांतरित प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी अर्ज केला असून पाठपुरावा करीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन