Dainik Maval News : मावळ (maval) विधानसभा (vidhan sabha) मतदारसंघातील राष्ट्रवादी (ncp) काँग्रेस पक्ष अजित पवार (ajit pawar) गटाच्या माजी उपसरपंचाकडून 36 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे (talegaon) पोलीस ठाण्याच्या (police) भरारी पथकाने सोमाटणे येथे माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (10 नोव्हेंबर) 36 लाख 90 हजार 500 हजारांची रोकड जप्त केली आहे
मावळ विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून 36 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (10 नोव्हेंबर) 36 लाख 90 हजार 500 हजारांची रोकड जप्त केली आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे.
सचिन शाबू मुर्हे (रा. सोमाटणे, चौराईनगर) असे रोकड जप्त केलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. तर सचिन मुऱ्हे यांची पत्नी धनश्री सचिन मुऱ्हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या त्या सदस्या आहेत.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. मुर्हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुर्हे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव पोलीस आणि भरारी पथकामार्फत मुर्हे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
सदर कारवाईत कार्यालयात 36 लाख 90 हजार 500 रूपयांची रोकड आढळून आली. मुर्हे यांना रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली. याबाबत निवडणूक विभाग आणि आयकर विभागाला कळविण्यात आले आहे. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती उपयुक्त गायकवाड यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती
– सोमाटणे गावच्या हद्दीत खासगी बसमधून सात लाखांचा ऐवज चोरीला । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती । Maval Vidhan Sabha