सीबीएसई बोर्डचा (CBSE) इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी (13 मे) रोजी जाहीर झाला. वडगाव मावळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल चा निकाल देखील समोर आला असून यंदाही शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुधांशू नायक यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतूक केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव शहरातील रिषिका विशाल बाफना या विद्यार्थिनीला दहावी CBSE बोर्डात 96 टक्के गुण मिळाले असून तिने पोदार शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. रिषिकासह दहावीच्या परीक्षेला बसलेले शाळेतील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांने उत्तीर्ण झाले आहेत. ( CBSE Board 10th Exam Result Declared Podar International School Vadgaon Maval )
रिषिका बाफना 96 टक्के गुणांसह प्रथम, सिद्धार्थ पाटील हा 95.20 टक्के गुण मिळवून दुसरा, तर अंकुर देशपांडे हा 94.80 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरा आला आहे. त्याशिवाय हयाज इमान याला 94.60 टक्के गुण, धृवी जोशी हिला 93.20 टक्के गुण, तनिष्का वाखारे 92.80 टक्के गुण, जान्हवी देशमुख 90.60 टक्के गुण या विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.
अधिक वाचा –
– घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर देहू नगरपंचायत प्रशासनाला जाग, 24 तासात अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सुचना
– सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक, विभागांनी शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– तळेगाव दाभाडे : महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान – अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार