Dainik Maval News : ‘आधी तोरण राज्यांच्या गडाला, मगच माझ्या दाराला’ हे ब्रीद सांभाळत श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेशी जोडलेल्या मावळ्यांनी मुळशी – मावळच्या सीमेवर असलेल्या तिकोना या गडावर जाऊन तेथील मुख्य प्रवेशद्वार तसेच मंदिराला तोरण बांधले. यावेळी तिकोना पेठ येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिववंदनेने गडावरील तोरण महोत्सव व मंदीर पूजेची सांगता कारण्यात आली.
गडकोटांचे संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या श्रीशिवदुर्ग संवर्धन व सह्याद्री आणि मी परिवार मावळ या संस्थाच्या माध्यमाने मागील 12 वर्षापासून दरवर्षी विजया दशमीचे औचित्य साधत तिकोना सह विविध गडावर पानफुलांचे तोरण बांधले जाते. तसेच तेथील मंदिर व परिसराची स्वछता करुन पूजन केले जाते.
विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी होणारे मावळे हे आपल्या घराची, दुकानाची,वाहनाची पूजा बाजूला ठेवून अगोदर गडाच्या पूजेसाठी हजर असतात. या मध्ये तरुण मुला- मुलींबरोबरच, लहान मुले, महिला देखील गड चढून उत्साहाने सहभागी होतात.
पूजन कार्यक्रमाच्या पूर्वतयारी साठी मुळशी व मावळमधील अनेक तरुण विजया दशमी सणाच्या आदल्या रात्रीच गडाच्या पायथ्याशी मुक्कामी जातात व विजया दशमी दिवशी भल्या सकाळी गडावर जाऊन मोठ्या श्रद्धेने मुख्य प्रवेशद्वारावर पान फुलांचे तोरण अर्पण करतात.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विजयादशमी निमित्त वडगावमधील शिवभक्त तरुणांचा अनोखा उपक्रम; शिवकालीन वेशभूषेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
– ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली तर्फे चाकण – वराळे नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ । Maval News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी

 
			






