Dainik Maval News : मध्य रेल्वे च्या कल्याण – लोणावळा विभागात पायाभूत कामे करण्यासाठी दिनांक ८ आणि दिनांक १० डिसेंबर रोजी विशेष ब्लाॅक घेण्यात येत आहे, या ब्लाॅकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल, असे रेल्वे कडून कळविण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा–बीव्हीटी यार्डमध्ये अप व डाऊन आणि इतर मार्गाच्या विस्तारासाठी तसेच अप यार्डमध्ये एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक असेल.
दिनांक ८ डिसेंबरचा ब्लॉक –
दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत ब्लाॅक आहे. या ब्लाॅकमुळे सीएसएमटी ते चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे ५ मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. तर, पुणे उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम होईल.
दिनांक १० डिसेंबरचा ब्लॉक
दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. ब्लाॅक कालावधीत नागरकोइल-सीएसएमटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस आणि दौंड–इंदौर एक्स्प्रेस या गाड्या पुणे विभागात १० ते ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येतील. तसेच पुणे उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात बदल केला जाईल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

