Dainik Maval News : ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रूडसेट संस्था) या संस्थेमार्फत आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ३४ प्रशिक्षणार्थीं होते.
- कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र रिंगणगावकर परीक्षक हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना स्वावलंबी होण्याचे महत्त्व सांगितले. प्रशिक्षिका अलका थोरात यांनी कोर्स दरम्यान दिलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेत महिलांच्या प्रगतीची माहिती दिली. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव व्यक्त करताना संस्थेचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले.
संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार यांनी या समारंभाने एक सामाजिक सकारात्मकता निर्माण केली असून अशा उपक्रमांनी महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशिक्षक हरीश बावचे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील, दिनेश निळकंठ, योगिता गरुड, रवी घोजगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News