व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News

देहू नगरपंचायत प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे बुधवारी हटविली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2025
in शहर, ग्रामीण, पुणे, लोकल
Dehu Nagar Panchayat administration takes immediate action Encroachments on roads removed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगरपंचायत प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे बुधवारी हटविली. या कारवाईत २० पेक्षा जास्त दुकाने, टपरी मागे हटविण्यात आली. तर, काही जणांनी स्वतःहून दुकाने मागे हटविली. तर काही ठिकाणी दुकानदार आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या किरकोळ वाद झाला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

  • काही दिवसांपूर्वीच आमदार सुनील शेळके यांनी देहूमध्ये येत आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी तातडीने पदपथ, रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर नगर पंचायत प्रशासनाने बुधवारी ही कारवाई केली.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून १८ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत अतिक्रमणे काढण्याची मागणी झाली होती. त्यात आमदार शेळके यांनीही नव्या टपरीधारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

  • बुधवारी सकाळी प्रशासनातर्फे देहू मुख्य प्रवेशद्वारापासून कारवाईला सुरुवात झाली. पुढे आंबेडकर चौक ते मुख्य देऊळवाडा या दरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावी, असे आवाहन केले. यास काही जणांनी प्रतिसाद दिला. तर, काहीजण कारवाई रोखण्यासाठी प्रशासनाची वाद घालू लागले.

मात्र, फुटपाथवर दुकाने असल्याने कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी चेतन कोंडे, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेंद्र आंधळे, अभियंता संगपाल गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम, रामदास भांगे, कर संकलन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, पाणीपुरवठा प्रमुख अक्षय रोकडे, महेश वाळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, नगरपंचायतचे ३५ कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडाकडे जाणारा रस्ता अरूंद आणि धोकादायक ! तातडीने रुंदीकरण, डागडुजी करण्याची मागणी । Lohgad Fort
– मोठी बातमी ! लोणावळासह मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली
– शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लवकरच लोकअदालतीचे आयोजन ; काय आहे संकल्पना, वाचा सविस्तर


Previous Post

महत्वाची बातमी ! लोणावळा शहर आणि मावळ ग्रामीण परिसरात वाहतुकीत मोठे बदल – पाहा पर्यायी मार्ग

Next Post

लोणावळा शहरात सुरू झाली ‘कल्पना चावला स्पेस अकॅडमी’ ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्य । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kalpana Chawla Space Academy started in Lonavala Students from rural areas will get priority

लोणावळा शहरात सुरू झाली 'कल्पना चावला स्पेस अकॅडमी' ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्य । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.