भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली आहे. चांद्रयान 3 नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या यशानंतर देशभर जलोषाचं वातावरण आहे. पुण्यात नागरिकांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चांद्रयान-3 मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. ( Chandrayaan-3 Landing India becomes the first and only country to land on Moons South Pole )
असं लँड झालं चंद्रावर चांद्रयान…
5.34 वाजता : लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली
5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.
5.56 वाजता : लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात आली, हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.
5.57 वाजता : रफ ब्रेकिंग फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली.
5..59 वाजता : फाईन ब्रेकिंग फेजही अगदी आरामात पार पडली. त्यानंतर शेवटची व्हर्टिकल डिसेंट फेज बाकी होती.
6.03 वाजता : चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. ( Chandrayaan-3 Landing India becomes the first and only country to land on Moons South Pole )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval
– राज्यात नवीन 19 हजार 577 अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान