व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या

भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली आहे. चांद्रयान 3 नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 23, 2023
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Chandrayaan-3-Landing

Photo - Dainik Maval Graphics Team


भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली आहे. चांद्रयान 3 नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या यशानंतर देशभर जलोषाचं वातावरण आहे. पुण्यात नागरिकांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. चांद्रयान-3 मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. ( Chandrayaan-3 Landing India becomes the first and only country to land on Moons South Pole )

असं लँड झालं चंद्रावर चांद्रयान…

5.34 वाजता : लँडर मॉड्यूलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. त्यामुळं ही मोहीम देखील यशस्वीपणे पार पडणार असल्याचा विश्वास इस्रोनं व्यक्त केला. या मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला चंद्राबाबत मोलाची माहिती मिळाली
5.44 वाजता : इस्रोच्या मिशन कन्ट्रोलनं लँडर मॉड्यूलला पॉवर डिसेंटची कमांड दिली. यानंतर लँडर मॉड्यूलनं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. यातील पहिला टप्पा हा रफ ब्रेकिंग फेजचा होता.
5.56 वाजता : लँडर मॉड्यूलची रफ ब्रेकिंग फेज यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर अल्टिट्यूड होल्डिंग फेज सुरू करण्यात आली. यामध्ये विक्रम लँडर हे चंद्रापासून 7.4 किलोमीटर उंचीवरून आणखी खाली नेऊन 6.8 किमी उंचीवर नेण्यात आली, हा टप्पा केवळ 10 सेकंदांचा होता.
5.57 वाजता : रफ ब्रेकिंग फेजनंतर, 10 सेकंदांची अल्टिट्यूड होल्डिंग फेजही यशस्वी झाली. यानंतर फाईन ब्रेकिंग फेजला सुरुवात झाली.
5..59 वाजता : फाईन ब्रेकिंग फेजही अगदी आरामात पार पडली. त्यानंतर शेवटची व्हर्टिकल डिसेंट फेज बाकी होती.
6.03 वाजता : चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. यानंतर चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. ( Chandrayaan-3 Landing India becomes the first and only country to land on Moons South Pole )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval
– राज्यात नवीन 19 हजार 577 अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’

Next Post

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Drug-Addicts

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.