Dainik Maval News : वडगाव मावळ येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधारकार्डची पडताळणी करून रोहिंग्या, बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांची शोध मोहीम राबवावी, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याकडे केली आहे.
भाजपाचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मनसेचे माजी तालुका प्रमुख रुपेश म्हाळसकर, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, भाजपाचे शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले, तालुका प्रभारी अतुल राऊत, देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, शिवसेनेचे समन्वयक अनिल ओव्हाळ, मकरंद बवरे, रवींद्र म्हाळसकर, श्रीनिवास कुलकर्णी आदींनी याबाबत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम (काश्मीर) या ठिकाणी दहशतवाद्यांकडून अमानुष गोळीबार झाला. ही अतिशय निषेधार्थ घटना आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये रोहिंग्या, बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यांचा शोध घेऊन त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.
त्याअनुषंगाने वडगाव येथे दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील परप्रांतीय विक्रेत्यांच्या आधारकार्डची पडताळणी मोहीम हाती घ्यावी आणि घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा हिंदू जनजागृती अभियानाच्या माध्यमातून योग्य ती पावले उचलली जातील, त्यामुळे प्रशासकीय विभागांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC