मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, डॉ. तानाजी सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
तसेच, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह परिवहन, गृह आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट्स तातडीने दूर करावेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या हद्दीतील ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी समन्वय करावे. वर्षातून किमान 3 वेळा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (Chief Minister Eknath Shinde Held Meeting To Decide Road Safety Measures And Revised Policy )
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजना व सुधारित धोरण ठरविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री सर्वश्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, डॉ. तानाजी सावंत आदी उपस्थित होते. pic.twitter.com/jbaVvYEQSZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 17, 2022
तसेच, राज्यात 23 ठिकाणी आधुनिक वाहन चाचणी केंद्र तसेच वाहन परवान्यासाठी स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ स्थापन करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागृती करण्यात यावी, हेल्मेट सक्तीची प्रभावी अमंलबजावणी, वाहनचालक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
अधिक वाचा –
गुलाल उधळला ! चांदखेड ग्रामपंचायतीवर ‘या’ पॅनेलची सत्ता, मीना माळी थेट जनतेतून सरपंच, वाचा संपूर्ण निकाल
मावळमध्ये कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश, नियोजनात्मक शेतीमुळे भातपिक जोमात, पावसाच्या तडाख्यापासूनही बचाव