Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते. – अशी प्रतिक्रिया एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आदिती तटकरे यांनी दिली आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC सुविधा उपलब्ध – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांना ही प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरून करता येणार असून, पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सुलभ होईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक सक्षम करण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाते.
महिला व बालविकास विभागाकडून e-KYC प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सोपी, सुलभ व सहज असून, लाभार्थ्यांनी गोंधळून न जाता व कोणत्याही आर्थिक मागणीस बळी न पडता ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नगरपरिषदा, नगरपंचायतींची प्रारूप मतदारयादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
– अखेर बिगुल वाजले ! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
– देवस्थानच्या शेतजमिनी हडप करणाऱ्यांचा खेळ खल्लास ! सरकारचा मोठा निर्णय