Dainik Maval News : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पंचायत समिती मावळ, पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि गेस्टँप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांसाठी एकदिवसीय बाल संरक्षण शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचा मुख्य उद्देश शालेय पातळीवर बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी शिक्षकांना कायदे व प्रतिबंधक उपायांची माहिती देणे होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
परिषदेचे प्रमुख पाहुणे मा. डी.के. अनभूले (न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, मावळ), मा. कुमार कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस स्टेशन) आणि पीएसआय अनुराधा पाटील (भरोसा सेल, पुणे ग्रामीण) हे होते. शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी वालेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ( Child Protection Education Council at Vadgaon Maval )
तज्ञ प्रशिक्षक सचिन करंजुले यांनी बाल लैंगिक शोषण कायदे आणि शाळा पातळीवर हे शोषण रोखण्यासाठी शिक्षक कशा पद्धतीने कार्य करू शकतात, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पीएसआय अनुराधा पाटील यांनी भरोसा सेल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डी.के. अनभूले यांनी आपल्या भाषणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याची माहिती द्यावी, तसेच पोक्सो कायद्याबाबत शिक्षकांना आवश्यक ते ज्ञान मिळावे, यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि बाल संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम किती आवश्यक आहे, यावर भर दिला.
परिषदेला संस्थेच्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन, कार्यक्रमाधिकारी शकील शेख, श्री संत तुकाराम महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक विद्यालय प्राचार्य धायगुडे ,केंद्रप्रमुख व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३०० शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश डिंबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शकीला शेख यांनी मानले.
अधिक वाचा –
– आवाहन ! अवजड वाहन चालकांनी मुंबई – पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, वाचा काय आहे सुचना
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे