चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीतून बंडखोरी केलेले शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी आपला बंडखोरीचा झेंडा खाली उतरवण्यास नकार दिला आहे. चिंचवडच्या जनतेच्या भावनांचा आदर करत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे राहुल कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन जिल्हा संपर्कप्रमुख नेते सचिन आहीर यांनी आज (10 फेब्रुवारी) राहुल कलाटे यांची भेट घेतली होती. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे कलाटे यांचे मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन स्वतः सचिन आहीर हे चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी कलाटे यांच्याशी चर्चा केली, तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करवून दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आहीर यांनी कलाटे हे योग्य निर्णय घेतली असा आशावाद प्रगट केला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र त्यानंतर राहुल कलाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले. ( Chinchwad Assembly By-Election Shiv Sena Rebel Candidate Rahul Kalate decision About Candidature Withdraw Read )
राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम राहिल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले नाना काटे यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपाच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्यासमोर आता नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळेच या पोटनिवडणूकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके बनले राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, पोटनिवडणूकीसाठी पक्षाकडून 20 नावे जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीसाठी बाळा भेगडे भाजपचे स्टार प्रचारक, पक्षाकडून 40 नावांची यादी जाहीर, वाचा