भारतीय जनता पार्टीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे दीर्घ आजाारने निधन झाले आहे. आज (मंगळवार, 3 जानेवारी) सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शोक व्यक्त केला. ( Chinchwad BJP MLA Lakshman Jagtap Passed Away Maval MP Shrirang Barne Paid Tribute )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”गेले अनेक दिवस लक्ष्मण जगताप कर्करोगावर उपचार घेत होते. दीर्घ आजाराने त्यांचे आज निधन झाले. अतिशय कमी वयात नगरसेवक ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, शहराचे महापौरपद त्यांनी भूषविले. विधानपरिषद आणि विधानसभेचेही ते आमदार झाले. लक्ष्मण जगताप हे शहराचे महापौर असताना मी महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. काही काळापुरते राजकीय मतभेद असतील. परंतु, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत, विकासात त्यांचे मोठे योगदान होते.”
हेही वाचा – तीर्थक्षेत्र देहूत विकास कामांचा धडाका; खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन, लोकार्पण
पिंपरी चिंचवडचे मा.महापौर,चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपुर्ण श्रद्घांजली ॐशांती ????@mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/CF6lkXKiCQ— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) January 3, 2023
“सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. गेली अनेक दिवस ते आजारी होते. त्या आजारावर ते मात करतील असे वाटत होते. परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होते. त्यांनी केलेले कार्य, त्यांचा असलेला सहवास पिंपरी-चिंचवकरांच्या लक्षात राहील. त्यांच्या जाण्याने शहराची मोठी हानी झाली आहे. कर्ततृत्वान नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, मावळ मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.” अशा शब्दात श्रीरंग बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अधिक वाचा –
– आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात आदरांजली । Lakshman Jagtap Passed Away
– मोठी बातमी! भाजपाचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन